पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड करण्यात आली आहे. शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आणि अकादमीच्या विविध उपक्रमांच्या योजनेबाबत सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर पत्रकार, व्याख्याते मकरंद मुळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. कला सहाय्यक आणि अभ्यासक म्हणून मकरंद मुळे यांनी समितीचे कामकाज करायचे आहे. मकरंद मुळे १९९५ पासून प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. साप्ताहिक आणि दैनिकाच्या संपादकीय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले मकरंद मुळे २०१० पासून जाहिरात, जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात मकरंद मुळे यांचा पुढाकार आहे. दिवाळी अंक आणि पुस्तके संपादन, प्रकाशन आणि पुस्तक परीक्षण यातून नव्या विषयांची मांडणी करण्याला मकरंद मुळे प्राधान्य देतात. एकूण १७ जणांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. चित्रपट, नाटक, नृत्य, चित्र, ललित, अभिजात यासह लोककला आणि माध्यम या क्षेत्रातील व्यक्तींचा समितीत समावेश आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading