पुश पिन्स कलाकार आबासाहेब शेवाळे यांनी बुध्दीबळ सोंगट्यांनी साकारलं ३० बाय २० फूटाचं महेंद्रसिंग धोनीचं चित्र

ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बुध्दीबळाच्या सोंगट्यांद्वारे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. महेंद्रसिंग धोनी याचा उद्या वाढदिवस असून त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला अनोख्या पध्दतीनं मानवंदना करण्यात आली आहे. आबासाहेब शेवाळे यांनी चेतन राऊत, मुकेश साळुंके, संदीप बोबडे आणि इतर २२ सहका-यांसह ही कलाकृती रेखाटली आहे. आबासाहेब शेवाळे हे पुश पिन्स पासून मोझॅक पोट्रेट बनवण्यात प्रसिध्द आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या नावावर ३ विश्वविक्रम आहेत. हे सर्व कलाकार ही कलाकृती तयार करण्यासाठी १३ दिवस झटत होते. या कलाकृतीची लांबी ३० फूट तर रूंदी २० फूट आहे. ही कलाकृती रेखाटण्यासाठी बुध्दीबळाच्या १ लाख ४१ हजार लाल, काळ्या, फिकट पांढ-या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या सोंगट्यांचा वापर करण्यात आला आहे. या कलाकृतीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. कोरम मॉलमध्ये ही कलाकृती सकाळी १० ते रात्री १० या वेळेत १४ जुलैपर्यंत पाहता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading