पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणे भारतातून दिसणार – दा कृ सोमण

या वर्षातील आजचे हे शेवटचे चंद्रग्रहण. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २० एप्रिल २०२३ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि १४ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत. परंतू ५ मे २०२३ रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. पुढच्यावर्षी २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट रोजी पौर्णिमा येत आहेत. त्यामुळे ३१ ॲागस्ट रोजी ‘ ब्ल्यू मून ‘ योग येणार आहे असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading