पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

७४ वर्षीय ॲण्ड्रू लोबो या ज्येष्ठ नागरिकाचा पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं मृत्यू झाला. पीएमसी बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळं बँकेचे खातेदार अडचणीत सापडले आहेत. ॲण्ड्रु लोबो हे आपल्या पत्नीसह राहत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. लोबो यांनी ३५ लाख रूपयांच्या ठेवी पीएमसी बँकेत ठेवल्या होत्या. या ठेवींवर मिळणा-या व्याजावरच त्यांचं जीवन अवलंबून होतं. पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे लोबो आणि त्यांची पत्नी पैसे कसे मिळणार आणि उपचार कसे करणार या विवंचनेत होते. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे आत्तापर्यंत ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading