पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा जाहीर

पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी जाहीर केल्या आहेत.
यंदा मुंबई महापालिकेने विशेष व्यवस्था केल्यामुळे समुद्राला उधान भरती आली तरी पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही असे सांगितले आहे. तरीही पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस व वेळा आपणास माहित असतील आणि त्याचवेळी जर प्रचंड पाऊस झाला तर काळजी घेता येईल म्हणून सोमण यांनी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस जाहीर केले आहेत.
४ जून रविवार दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी उधान भरती आहे. ५ जून सोमवार दुपारी १ वाजता, ६ जून मंगळवार दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी, ७ जून बुधवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी, ८ जून गुरुवार दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी, ३ जुलै सोमवार दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी, ४ जुलै मंगळवार दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी, ५ जुलै बुधवार दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी, ६ जुलै गुरुवारी दुपारी २ वाजून २३ मिनिटांनी, ७ जुलै शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी, ८ जुलै शनिवार दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी, १ ॲागस्ट मंगळवार सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी, २ ॲागस्ट बुधवार दुपारी साडेबारा वाजता, ३ ॲागस्ट गुरुवार दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी, ४ ॲागस्ट शुक्रवार दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी, ५ ॲागस्ट शनिवारी दुपारी २ वाजून ३८, ६ ॲागस्ट रविवार दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी उधान भरती येणार असल्याचं दा कृ सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading