पालघर जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून कालही असे सौम्य धक्के पुन्हा जाणवले. पालघरमध्ये काल सकाळी पावणेआठच्या सुमारास २.६ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जिवितहानी अथवा वित्तहानी झाली नसल्याचं सांगितलं जातं. पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये जवळपास गेल्या नोव्हेंबरपासून अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळं येथील रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading