पार्क केलेल्या गाड्यांवर कोसळले ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेनुसार कापूरबावडी, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे सिनेवंडर मॉल समोर, एच.पी. पेट्रोल पंप बाजूला एम. बी. सी. सेंटर, प्लॉट नंबर १४३/ए मद्ये पार्क केलेल्या ५ नवीन चार चाकी व २, ३ दुचाकी वर ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग पडली आहे. सदर घटनास्थळी माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक (श्री. महेंद्र भोईर सो.), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १ इमर्जन्सी वाहनासह उपस्थित आहेत. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही. सदर होर्डिंग पडल्यामुळे दोन झाडांचे देखील नुकसान झाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading