पारसिक रेतीबंदर परिसरातील झोपडपट्ट्यांना करण्यात आलेल्या रंगरंगोटीची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

पारसिक रेतीबंदर परिसरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं विशेष प्रयत्न केले असून मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्ट्यांना करण्यात आलेल्या आकर्षक रंगरंगोटीची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. महापालिका आयुक्तांनी रेतीबंदर झोपडपट्टी परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं विविध विकासकामांचा शुभारंभ केला आहे. या मुलभूत विकासकामांबरोबरच हा परिसर आकर्षित दिसावा याकरिता आठही झोपडपट्ट्यांची मुंबईतील मिसाल या संस्थेतर्फे रंगरंगोटी करण्यात आली आहे. पाहणी दरम्यान पालिका आयुक्तांनी महिलांशी संवाद साधला. महापालिकेच्या वतीनं या महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून उत्पादन केंद्राबरोबरच विक्री केंद्राची देखील निर्मिती केली जाणार आहे. त्यावेळी उपस्थित महिलांनी रेतीबंदर परिसरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट केल्याबद्दल पालिका आयुक्तांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading