पाणी बीलातील त्रुटी प्रभाग समिती कार्यालयातून दुरूस्त करून घेण्याचं पाणी पुरवठा विभागाचं आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रातील नळ संयोजन धारकांना २०१९-२० या आर्थिक वर्षातील देण्यात आलेली घरगुती पाणी बीलं क्षेत्रफळानुसार वितरित करण्यात आली असून काही प्रमाणात क्षेत्रफळ, थकबाकी आणि प्रशासकीय आकाराची रक्कम यामध्ये त्रुटी असल्यास नागरिकांनी संबंधित प्रभाग समितीमध्ये कार्यालयीन वेळेत दुरूस्ती करून घेण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नळ संयोजन धारकांना २०१९-२० या आर्थिक वर्षातील देण्यात आलेली घरगुती पाणी बीलं क्षेत्रफळानुसार वितरित करण्यात आली आहेत. नागरिकांनी बीलाची प्रत आणि यापूर्वी भरणा केलेल्या बीलांच्या पावत्या संबंधित प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत बील वसुली लिपिकाकडून त्रुटी असल्यास दुरूस्ती करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading