पाचपाखाडीतील पूनमछाया इमारतीवर झाड पडले- सुदैवानं कोणतीही दुखापत नाही

पाचपाखाडीतील हुंदाई शोरूम च्या मागील पूनम छाया इमारतीवर एक झाड पडण्याची घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. आज सकाळी १० च्या सुमारास पूनम छाया इमारतीच्या बी विंग वर हे झाड पडले. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी-कर्मचारी, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, महापालिका अधिकारी कर्मचा-यांनी तातडीनं धाव घेऊन घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं. पुनम छाया सोसायटीच्या पिलरला तडे गेले असून, बांधकाम जीर्ण झालेले असल्यामुळे ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने हे झाड पुर्णपणे कापून बाजूला करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये चार कुटुंब राहत असून, इमारत धोकादायक असल्यामुळे त्या चारही कुटुंबांना खोली रिकामी करण्याबाबतची सूचना देण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading