परिवहन समिती सदस्यत्वाचा तिढा सुटला – १२ सदस्यांची बिनविरोध निवड

ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य म्हणून १२ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. परिवहन समितीतील १२ जागांसाठी १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पण शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी आपले अर्ज आज मागे घेतल्यानं १२ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये शिवसेनेचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भारतीय जनता पक्षाचे २ सदस्य परिवहन समितीमध्ये बिनविरोध निवडले गेले आहेत. शिवसेनेचे विद्यमान परिवहन सदस्य राजेंद्र महाडीक आणि काँग्रेसच्या राम भोसले यांनी आज आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळं शिवसेनेतर्फे विलास जोशी, अरूण पाटील, प्रकाश कोटवानी, पूजा वाघ, मिलिंद मोरे, बालाजी काकडे, राष्ट्रवादीतर्फे शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. परिवहन समिती सदस्यत्वासाठी ४ मार्चला निवडणूक होणार होती. मात्र १२ जागांसाठी १२ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यानं आता केवळ औपचारिकता उरली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading