नौपाडा प्रभागातील थकीत मालमत्ताधारकांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले असून आज नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील थकीत मालमत्ता धारकांवर कडक कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आज नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बी केबिन- नौपाडा परिसरातील थकीत मालमत्ताधारकांवर कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या. नजीकच्या काळात थकीत मालमत्ताधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून ज्यांनी मालमत्ता कर अद्याप पर्यंत जमा केलेला नाही अशा सर्व मालमत्ता धारकांनी कराची देय रक्कम महापालिकेकडे तात्काळ जमा करून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading