नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना केला परत

नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना परत केला. यामध्ये तक्रारदार अनुजा कुलकर्णी यांचा सॅमसंग गँलॅक्सी कंपनीचा मोबाईल त्यांच्या क्लिनिक मधुन चोरून आरोपीने चेन्नई येथे विकला होता, तो पोलिसांनी मोठ्या हुशारीने हस्तगत केला. चरई येथील रविंद्र कारेकर यांच्या घरातील पंधरा ग्रॅमची सोन्याची चैन, दोन फोन, दोन घड्याळ असा चोरून नेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला, त्या नंतर मुंब्रा येथील आलम खान यांची ऑडी गाडी परस्पर विकली होती ती पोलिसांनी नागपूर येथून जप्त केली. आरती वाळंज यांच्या घरातून सोने आणि चोरीा 81 हजार रुपये हस्तगत केले. नौपाडा येथील दीपिका गंगूत्रे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची चेन हस्तगत करून त्यांना परत देण्यात आली. रोहित कदम यांची चोरीला गेलेली ऍक्टिव्हा गाडी ताब्यात घेण्यात आली, सुनिल नलावडे यांचा नितीन कंपनी येथून चोरून नेलेला मोबाईल त्यांना परत करण्यात आला. महेश दळवी यांची चोरून नेलेली हिरो होंडा मोटारसायकल बेवारस मिळून आली ती त्यांना परत करण्यात आली,डॅनियल अल्मेडा यांची चोरून नेलेली टीव्हीएस मोटारसायकल परत करण्यात आली, राजकुमार यादव यांची चोरून नेलेली रिक्षा त्यांना परत करण्यात आली, चंद्रकांत कातकडे यांची चोरून नेलेली याम्हा कंपनीची फसीनो मोटार सायकल तलावपाळी येथे मिळाली ती त्यांना परत करण्यात आली, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि त्यांच्या सहका-यांनी हा सर्व 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading