नौपाडा कोपरी प्रभाग समितीअंतर्गत भगवती मैदान येथे भरवण्यात येत असलेले घाऊक भाजीपाला मार्केट आज रात्री १२ वाजल्यापासून १७ मे च्या रात्री १२ पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नौपाडा-कोपरी समितीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन करूनही नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचं दिसून आलं. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नसून लॉकडाऊन असताना रूग्णांची संख्या मात्र कमी होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे आज रात्रीपासून १७ मे पर्यंत हे मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.