नॅान कोविड रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत का याची तपासणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

नॅान कोविड रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत का याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहेत. यासाठी वैद्यकिय आरोग्य अधिका-यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे शहरामध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या वतीने कोविड रूग्णालये घोषित करण्यात आली आहेत.
तथापि महापालिकेने घोषित केलेल्या कोविड रूग्णालयांशिवाय नॅान कोविड रूग्णांलयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॅा. मुरूडकर यांना अशा रूग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.या रूग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके नॅान कोविड रूग्णालयांना भेट देवून त्या ठिकाणी कोविड रूग्णांवर उपचार घेत आहेत का याची तपासणी करणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading