निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्या भत्त्यांमध्ये तफावत असल्याने पोलीसांमध्ये नाराजी

निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस दल यांच्या भत्त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे साध्या शिपायास 1100 रुपये भत्ता देण्यात येत असतानाच पोलिसांना केवळ 300 रुपये भत्ता दिला जात आहे. ही तफावत दूर करुन पोलिसांच्या निवडणूक भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी महापालिकेचे माजी स्वीकृत सदस्य नंदकुमार फुटाणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा आणि अन्य महामंडळांच्या निवडणुक कार्यक्रमात सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांसोबत पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असते. मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत पोलिस कर्मचा-यांना सुध्दा त्याठिकाणी पुर्णवेळ ड्युटी दिलेली असते.
मतदान केंद्रावर शांतता आणि सुरक्षा राखणे, मतदान केंद्रामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही. तसेच मतदान शांततेने पार पाडावे, याकरिता जबाबदारी या पोलिस कर्मचार्‍यांवर असते. या पोलिसांना केवळ 300 रुपये तर मतदान केंद्रावरील शिपाई कर्मचार्‍यास 1100 इतका भत्ता दिला जात असल्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading