नाताळ सर्वत्र उत्साहात साजरा

जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश देणा-या येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीनं साजरा करण्यात आला. येशूच्या जन्मानिमित्तानं विविध चर्चमध्ये खास प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाताळ उत्सवाच्या निमित्तानं विविध चर्चेसवर रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. अनेक चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे उभारण्यात आले होते. ख्रिश्चन बहुल भागात नाताळचं वातावरण विशेष जाणवणारं होतं. नाताळच्या निमित्तानं येणारा सांताक्लॉज हे बालवर्गाचं मोठं आकर्षण असतं. नाताळच्या आदल्या दिवसापासून फिरणा-या या सांताक्लॉजकडून खाऊ घेण्यासाठी बालवर्गाची धडपड सुरू असल्याचं दिसत होतं. बग्ग्यांमधून लहान मुलांना खाऊ वाटत फिरणारा सांताक्लॉज हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading