नागदेवतेची पूजा करून नागपंचमी साजरी

आज नागपंचमी. घरोघरी नागदेवतेची पूजा करून आज नागपंचमी साजरी करण्यात आली. श्रावण महिना म्हणजे सणासुदीचा महिना. पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे सगळेच सण घरातच साजरे करावे लागत आहेत. नागपंचमीला नागाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची पारंपरिक पध्दत आहे. घरोघरी नागाचं चित्र काढून किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण. हिंदू धर्मात नागाला भगवान शंकरांच्या गळ्यातील हार आणि भगवान विष्णू यांची शय्या म्हटले जाते आणि याचमुळे नागाची पूजा केल्या भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात असे म्हटले जाते. नागपंचमीच्या दिवशी शेतकरी काम करीत नाहीत. खोदकाम केले जात नाही. तसेच पूर्वीच्या काळी स्त्रिया या दिवशी चिरणे, कापणे अशी कामे करत नसत त्यामुळे उकडीचे मोदक, पुरणाचे दिंड, खांडवी असे पारंपरिक पदार्थ नागाला नैवेद्यासाठी घरोघरी केले जातात. हल्लीच्या युगात चिरणे, कापणे या क्रिया न करणे शक्य नाही परंतु गावात अजूनही या प्रथा सांभाळून सण साजरे करताना दिसून येतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading