नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थीनींची राजेश मढवी फौंडेशनकडून व्यवस्था

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तलासरी सारख्या दुर्गम भागातून नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी आदिवासी विद्यार्थीनींचे ठाण्यात आगमन झाले. घरातील हलाखींची परिस्थिती,दुर्गमस्थळ, डोंगरात, पाड्यात निवासाचे ठिकाण, सतत पोटाची भ्रांत आणि शिक्षणापासून वंचितता या सर्व संकटावर मात करून शिक्षण घेत असलेल्या आणि त्यातही मुली. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.अशा विद्यार्थीनींची ठाणे महापालिकेच्या मदतीने तसेच डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून परिक्षाकाळात निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था तसेच इतर सर्वतोपरी मदत नगरसेविका प्रतिभा मढवी आणि राजेश मढवी यांचेतर्फे करण्यात येत आहे.याबाबत परिक्षार्थि सर्व विद्यार्थीनी मढवी दाम्पत्याचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading