धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्रात हृदयावरील यशस्वी शस्त्रक्रिया

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे.गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरत आहे. नुकतीच या रुग्णालयामध्ये हृदयाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. राम गुप्ता हे गेल्या कित्येक दिवसापासून हृदयविकाराच्या त्रासाने त्रस्त होते. परिस्थिती नसल्याने खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणे त्यांना शक्य होत नव्हते. मात्र आता ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरु झाल्याने गुप्ता यांनी या ठिकाणी मोफत हृदयविकाराची शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वीरित्या पार पडली. प्लॅटिनम हॉस्पीटल आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिब ठाणेकरांना अत्यल्प दरामध्ये सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये टू डी इको पासून ते ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, स्टेंन्ट टाकणे, याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह विविध उपचार हे विनामूल्य दिले जात आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधीन असणाऱ्या नागरिकांना हे उपचार मोफत देण्यात येणार असल्याचे प्लॅटिनम हॉस्पीटल जनसंपर्क प्रमुख भूषण गावकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading