धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट “धर्मवीर”_मुक्काम_पोस्ट_ठाणे चित्रपट प्रदर्शित

धर्मवीर_मुक्काम_पोस्ट_ठाणे हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या सिनेमाचा खास शो सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यासमयी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघेच्या कटआउट समोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला. हा सिनेमा आजच्या तरुणाईला धर्मवीर आनंद दिघेची खरी ओळख करून देणार असून जास्तीत जास्त लोकांनी तो पहावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यासमयी बोलताना केले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, या सिनेमात दिघेची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक, तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading