दोन वेगवेगळ्या घटनात उपनगरीय गाडीतून पडून तीन जणांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या घटनात उपनगरीय गाडीतून पडून तीन जणांचा मृत्यू होण्याची घटना काल घडली आहे. नावेद शेख, इम्रान शेख आणि प्रदीप प्रजापती हे तिघेजण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणा-या उपनगरीय गाडीत मुंब्र्याला चढले. यापैकी एकाचा रेल्वे खांब लागल्यामुळे मृत्यू झाला. रेल्वेतून पडताना स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा खांबाला धक्का लागला. तर त्याला वाचवायला गेलेले हे दोघेही उपनगरीय गाडीतून खाली पडले. यामध्ये नावेद आणि इम्रान यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रजापती गंभीर जखमी अवस्थेत आढळला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नावेद हा घरात एकटाच कमावणारा होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading