हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध

हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकात पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागातील गोरीपोरा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नसून सतत सैनिकांचे बळी जात आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणा-या पाकिस्तानचे आव्हान मोडून काढणं आवश्यक आहे. केंद्र शासनानं जनभावना लक्षात घेता आतंकवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला नामशेष करावे आणि काश्मिरमधील फुटीरतावाद्यांचे संरक्षण काढून त्यांना अन्य राज्यातील कारागृहात बंद करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading