दुर्मिळ गाड्यांच्या फेरीला ठाणेकरांनी केली गर्दी

ठाण्यामध्ये काल दुर्मिळ अशा गाड्यांची एक फेरी काढण्यात आली होती. या दुर्मिळ गाड्यांच्या फेरीला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उद्योगपती गौतम सिंघानिया, विवेक गोएंका आदी मान्यवरही या फेरीत सहभागी झाले होते. ठाण्यामध्ये दुर्मिळ गाड्यांच्या एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल फेडरेशनला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रेमण्ड, फेडरेशन आणि ठाणे वाहतूक शाखेतर्फे संयुक्तपणे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं तर काल संपूर्ण ठाण्यात या गाड्यांची फेरी काढण्यात आली होती. १८८६ ते १९८० पर्यंतच्या ४० हून अधिक दुर्मिळ गाड्या आणि २७ दुचाकी या २१ किलोमीटरच्या फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आनंदनगर चेकनाक्यापासून सुरू झालेली ही फेरी तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, उपवन, पोखरण रोड नंबर १, येऊर, काशीनाथ घाणेकर चौक, मानपाडा चौक, ब्रह्मांड, तुळशीधाम, वर्तकनगरमार्गे पुन्हा रेमण्ड कंपनीमध्ये विसर्जित झाली. या फेरीमध्ये मर्सिडीज बेन्झ, कॅडीलॉक, वोक्सवॅगन, रोल्स रॉईल्स अशा दुर्मिळ कार तर लॅमरेटा, व्हेस्पा, रॉयल एनफिल्ड, होंडा अशा दुचाक्या पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती. या फेरीनं दुर्मिळ गाड्यांच्या प्रदर्शनाची सांगता झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading