मुंब्रा, डायघर, दिवा परिसरात दुचाकी आणि रिक्षांची चोरी करणा-या चौघांना मुंब्रा पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून १२ मोटरसायकल आणि ३ रिक्षा अशी ६ लाख ७० हजारांची वाहनं जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत दुचाकी वाहन चोरीमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंब्रा, दिवा या भागात पोलीसांनी गस्त वाढवून अशरद शेख, सुरेश सरोज, अमान शेख आणि सुफियान अन्सारी या चौघांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.