दुचाकींच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर्स लावणा-यांवर कारवाई करण्याची सत्यजित शहा यांची मागणी

दुचाकींच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर्स लावणा-यांवर कारवाई व्हावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे. दुचाकीच्या मागे अथवा पुढे कोणत्याही प्रकारचे स्टीकर्स लावणं हे महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम कलम १३४ पोटकलम ६ अंतर्गत गुन्हा आहे. मात्र दर १० ते १२ दुचाकींमागे वेगवेगळी स्टीकर्स लावलेली असतात. पोलीस, ॲडव्होकेट, प्रेस अशाप्रकारचे स्टीकर्स दुचाकींवर आढळतात. पुराव्यादाखल त्यांनी एका दुचाकीवर तर पोलीस असा स्टीकर असून मागच्या बाजूस ॲडव्होकेट असाही स्टीकर लावण्यात आलेल्या दुचाकीचं छायाचित्र पुरावा म्हणून दिला असून याप्रकारे दुचाकींवर स्टीकर लावणा-यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading