आदिवासी जमिनीवर होण्याऱ्या अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आदिवासी जमिनीवर होण्याऱ्या अनधिकृत बांधकामाची तत्काळ दखल घेतली असून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हाधिका-यांना दिले आहेत. कळवा विभागात कळवेश्वर नगर येथील आदिवासी शेत जमिनीवर भूमाफिया कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत सात माळ्याचे बांधकाम करत असल्याचे दिसून येताच निर्धार संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिका-यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. अनधिकृत बांधकाम तूर्तास तरी बंद करण्यात आले असून कळव्याचे तलाठी पुढील कारवाई करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading