दिवा येथील चरणदास इमारतीच्या पहिल्या आणि दुस-या माळ्याचा गॅलरीचा भाग पडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. ही इमारत तळ अधिक दोन माळ्यांची असून ४५ वर्ष जुनी आहे. धोकादायक असल्याने ही इमारत रिकामीच होती. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरीत पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.