दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच आहे. आज दिवा परिसरातील 7 अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत अली यांचे अंदाजे 2500 चौ.फूट मोजमापाचे प्लिंथ, उमर यांची अंदाजे 2000 चौ.फूट मोजमापाच्या प्लिंथची दोन बांधकामे, हनिफ यांची अंदाजे 120 बाय 50 चौ.फूट मोजमापाचे प्लिंथ, मुजीब यांचे अंदाजे 550 चौ.फूट मोजमापाचे पाचव्या माळ्यावरील अव्याप्त 1 रुम, त्याचे 2 कॉलम व स्लॅब, सय्यद यांचे अंदाजे 600 चौ.फूट मोजमजाचे पाचव्या माळ्यावरील अव्याप्त एक रुम आणि 3 स्लॅब, परवेझ बशीर खान यांचे अंदाजे 80 बाय 80 चौ. फूट मोजमापाचे दुसऱ्या माळ्यावरील बांधकाम आणि स्लॅब निष्कसित करण्यात आले. ही कारवाई 1 पोकलेन, 3 गॅसकटर, 1 ट्रेलर, 80 कामगार, 13 पोलीस, 6 जीप, 3 जेसीबी, 4 टेम्पो आदी यंत्रसामुग्री आणि कामगारांच्या सहाय्याने करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading