दिव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी ८ तास बंद

दिव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी ८ तास बंद राहणार आहे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा जुन्या प्रभाग क्र. २७ आणि २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहीनीव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहीनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड, येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहिनीला झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक असून मुख्य जलवाहीनी वरील गळती बंद करण्याकरीता शुक्रवारी सकाळी १० ते ६ या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र. २७ आणि २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरातील पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा. या गळतीचे काम पूर्ण झाल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बैतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, बि.आर. नगर, मुन्द्रा देवी कॉलनी, साबे गाव, दिवा पश्चिम इ. परिसरसताल पाण्या संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तरी दुरूस्तीच्या कामासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading