दिव्यांगांसाठीच्या स्टॉलची अनामत रक्कम महापालिका उद्यापासून स्वीकारणार

दिव्यांगांच्या गांधीगिरी आंदोलनाला यश मिळालं असून महापालिका दिव्यांगांसाठीच्या स्टॉलची अनामत रक्कम उद्यापासून स्वीकारणार आहे. तीन महिन्यापूर्वी महापालिकेकडून दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी स्टॉलचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र मान्यता मिळत नसल्याचं कारण सांगून संबंधित विभागाकडून अनामत रक्कम स्वीकारली जात नव्हती. जागतिक दिव्यांग दिनी म्हणजे ३ डिसेंबरला १ हजार दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी स्टॉल देण्याचं पालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलं होतं. मात्र या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र नंतर १ हजार पैकी ३१६ जणांना स्टॉल देण्याचं प्रस्तावित करण्यात आलं. पण यासाठीचा करार पालिका करत नव्हती. याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही उपयोग न झाल्यामुळं बृहन् महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेनं गांधीगिरी पध्दतीनं आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अनामत रक्कम उद्यापासून स्वीकारण्याचं आश्वासन दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading