दिवा शहराजवळील म्हातार्डी गावच्या ग्रामस्थांचा बुलेट ट्रेनला विरोध

ठाणे मनपाच्या हद्दीतील दिवा शहराच्या जवळील असलेल्या मौजे म्हातार्डी गाव येथील बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झालेल्या व प्रत्यक्ष जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे म्हातार्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ज्यांचा जमिनीचा कब्जा नसतांना अधिकाऱ्यांशी हातमीळवनी करुन मोबदला प्रत्यक्ष जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना न देता इतरांना दिल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

गेल्या ८० ते १०० वर्षा पासून आमच्या ५ पिढी पासून ही जमीन आम्ही कसत आहोत.आम्हा शेतकऱ्यांच्या अशिक्षित पणामुळे आम्ही जमिनीवर कुळाची नोंद केली नाही.
आमच्या म्हातार्डी गावातील बुलेट ट्रेनच्या जागेसाठी अनेक एकर जमीन बाधित होत असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अजून मिळाला नाही तो लवकरात लवकर मिळावा, स्थानिक शेतकऱ्यांची जमीन असल्याने बुलेट ट्रेनच्या स्टेशनचे नाव म्हातर्डी द्यावे तसेच स्थानिक भूमीपुत्रांना नोकरी देण्याच लेखी आश्वासन द्यावे अन्यथा समस्थ म्हातार्डी गावातील भूमिपुत्र शेतकरी याचा तीव्र विरोध असेल. तसेच बुलेट ट्रेनसाठी बाधित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आम्ही शेतकरी आमरण उपोषणाला बसू किंवा सामूहिक आत्महत्या देखील करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रकरणी सरकारने गांभीर्याने दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना योग्य न्याय दयावा असे सांगितले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading