ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील एनआरनगर तळ अधिक ३ मजली इमारतीतील ४ थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.