दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरु करा – सह्यांची मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवलेले आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी  रेल्वे राज्यमंत्री व अखेर पंतप्रधानांकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली त्याच धर्तीवर दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरु करा अशी मागणी पत्राद्वारे केली. परंतु याची दखल घेत नसल्याने जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधले आहे. त्या जनतेच्या प्रश्नासाठी व जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली व दिघा गाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसेच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने   मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन उस्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला दिला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading