एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत.
भर रस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण केरत तिचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून सांगितले की, तू तुझ्या बहिणीला सांग माझ्याशी लग्न कर. मी तिच्यावर प्रेम करतो. इतके बोलून तरुणाने पळ काढला आहे. हेमंत गमरे नावाच्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक तर्फी प्रेमातून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मात्र या घटनेची माहिती त्या तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली आहे. पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलिस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. पळणारा तरुण हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading