दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून पिस्तुलातुन गोळी झाडणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून पिस्तुलातुन गोळी झाडणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे.

अक्षय पाटील उर्फ शुभी आणि दीपेश उर्फ मामा असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. काल रात्री दिवा स्मशानभूमी परिसरात ही घटना घडल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. आगासन गाव येथे राहणा-या दिनेश मुंढेला काल रात्री अक्षय आणि त्याचा साथीदार दीपेश उर्फ मामा या दोघांनी दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यावेळी अक्षयने आपण डोंबिवलीचा ओरिजनल भाई आहे फेसबुक भाई नाही हे दाखवण्यासाठी तुला बोलावले असून तुला इथेच ठोकतो, असे धमकावत पिस्तुलातून एक राउंड फायर केला. मात्र सतर्क झालेल्या दिनेशने ती गोळी चुकवली आणि त्याच्या हातातील पिस्तुल घट्ट पकडून ठेवले. या झटापटीत अक्षयने त्याच्याकडील पिस्तुलमधून तीन राउंड फायर केले. पिस्तुलच्या आवाजाने गावातील नागरिक जमा झाल्यानंतर अक्षय आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून पळून गेले. या घटनेनंतर दिनेश मुंढे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतांना अक्षय याने फोन करून आज तु वाचलास पण तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि धमकी देणे असा गुन्हा दाखल करून मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे यांच्या पथकाने दोघाना काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात सापळा रचुन अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading