संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि शिवतेज महिला गोविंदा पथकाला

शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि महिलांसाठी राखीव असलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला. यंदाचा उत्सव हा मोठ्या स्वरूपात साजरा न करता आणि पारंपरिक पद्धतीने कोणतीही स्पर्धा न करता एक उत्सव एक सण समजून साजरा करुन जास्तीत जास्त मदत या उत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली आणि कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात येईल. असे आयोजक आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले होते. सुमारे १५० हुन अधिक पथकाने उत्सवाला भेट देऊन आपली नोंदणी केली आणि त्यातील १०० हुन अधिक पथकांनी विजयी सलामी दिली. सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह बक्षिसाची स्वरूपात करून गौरविण्यात आले. तसेच दहीकाला उत्सवामध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने गोंविंदा पथक मध्ये सामील होऊन हंडी फोडून एक वेगळा उत्साह निर्माण केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading