दहावी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 27 जूनपर्यंत मुदत  

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै/ ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास नियमित शुल्कासह 27 जूनपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव कार्यालयातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे  कळविली आहे.

            माध्यमिक शाळांमार्फत पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेणारे विद्यार्थी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट (Transfer of Credit) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इ.10 वीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि.20 जून ते 27 जूनपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज सादर करावे, अशी माहिती या पत्रकात दिली आहे.

             दि.28 जून व 29 जून यादिवशी माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावे व शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि.30 जून 2022 रोजी जमा करावे. या संदर्भात काही अडचणी असल्यास संबंधित मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading