दहावीच्या निकालासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाईन सेवा सुरु झाली आहे.मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालये यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळाने दूरध्वनी क्रमांक 022-27893756/ 27881075 ही हेल्पलाईन सुरु केली आहे. ही हेल्पलाईन 24 जून पर्यंत कार्यान्वित राहील. हेल्पलाईनच्या वेळा 24 जूनपर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहिल, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.