तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे अशा घोषणा देत जिल्ह्यातील तब्बल १३४ तृतीयपंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले. निमित्त होते एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने आयोजित ‘एक मैल’ दौडचं. पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे या ‘एक मैल’ दौडचे आयोजन करण्यात आले. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी या एक मैल दौडचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर
जिल्ह्यातून १३५ तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी झाले होते. १५ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये यश माबेकर प्रथम, स्वराज गावकर द्वितीय आणि गौरव आर्या याने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील मुलांमध्ये अजय यादव प्रथम, रवी सोनकर द्वितीय आणि सदाफल चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील मुलांमध्ये नारायण बागवडे प्रथम, शान सिन्हा द्वितीय तर गंधर्व शेट्टी हा तिसरा आला. ४५ वर्षांपुढील वयोगटात प्रथम अमित प्रभू, द्वितीय भास्कर कृष्णमूर्ती तर तिसरा क्रमांक शैलेश सापळे याने पटकाविला. १५ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये गायत्री शिंदे प्रथम, मीरा फाटक द्वितीय आणि अपूर्वा देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील मुलींमध्ये पूनम गुप्ता प्रथम, लेखना कणेकर द्वितीय आणि लता सोलंकी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हेता ठक्कर प्रथम, दीपल पटेल द्वितीय तर मंजिरी प्रभू यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ४५ वर्षांपुढील महिला वयोगटात प्रथम संगीता खेतान, द्वितीय मिनी सुबोध तर तिसरा क्रमांक धरती पोंडा यांनी पटकाविला. तृतीयपंथीमध्ये रुपाली केणे प्रथम, अंजली केणे द्वितीय आणि मलिका केणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकपूरम शाळेचे डॉ. राकेश यादव, रमेश दळवी, प्रमोद कुलकर्णी, वसंत विहार शाळेचे ऍथलिटिक कोच सुनील होनमाने, छत्रपती पुरस्कार विजेते म्हापुस्कर, ठाणे जिल्हा ऍथलिटिक असोसिएशनचे सचिव अशोक अहिरे, सहसचिव राजेंद्र मयेकर आदींचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading