तीव्र उन्हाळ्यामुळे पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण

सध्या उन्हाळा तीव्र होऊ लागला असून पक्षीही पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. पाण्याच्या शोधात असे पक्षी आढळत आहेत. आज ठाण्यात पोपट आणि घार हे पक्षी आढळले. कॅसल मिलजवळील सुमेर कॅसल मध्ये ग्रीलमध्ये अडकलेला एक पोपट मिळून आला. सुमेर कॅसलमधील ९०४ क्रमांकाच्या सदनिकेत संजीव कोहली राहतात. त्यांच्या सदनिकेच्या बाल्कनीत सकाळच्या सुमारास हा पोपट अडकला होता. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन या पोपटाची ग्रीलमधून सुटका केली. बहुधा हा पोपट पाण्यासाठीच आला असावा. त्याची मान ग्रीलमध्ये अडकली होती. त्यामुळं मानेला जखम झाली होती. त्याची सुटका केल्यानंतर त्याला ब्रह्मांड येथील प्राण्यांच्या रूग्णालयात पाठवण्यात आलं. दुसरा प्रकार वागळे इस्टेटमध्ये घडला. एक काळ्या रंगाची घार वागळे इस्टेटमधील शो-रूममध्ये आढळून आली. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकास मिळताच त्यांनी त्वरीत धाव घेऊन जखमी अवस्थेतील या घारीची सुटका केली. या घारीला नंतर पुढील उपचारासाठी कोकणीपाडा येथील रूग्णालयात पाठवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading