ढोल, ताशे, डिजेविना यंदाचं गणेश विसर्जन

पाचव्या आणि सहाव्या गणेश विसर्जनाप्रमाणेच अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनावरही कोरोनाचं सावट पहायला मिळालं. अगदी अपवाद वगळता फटाक्यांचे आवाज ऐकायला मिळाले. अन्यथा विसर्जन अतिशय शांततेत पार पडलं. कोरोनामुळे घरगुती गणपती विसर्जनासाठी नेताना विसर्जनासाठी कितीजणांनी जायचं यावर निर्बंध होते. यामुळं साधारणत: तीन लोकं गणपती विसर्जनासाठी नेताना दिसत होते. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा ऐकायला येत होत्या. सर्वसाधारणपणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाण्यातील महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. पण यंदा मात्र गणेश विसर्जनाच्या वेळी कोणतेच रस्ते बंद नव्हते. सर्व रस्त्यांवरून कोणत्याही वाहतूक कोंडीविना वाहतूक सुरू होती. मासुंदा तलाव परिसरात एका बाजूला गणपती विसर्जन सुरू होतं तर दुसरीकडून नियमित वाहतूक सुरू असल्याचं चित्र पहायला मिळत होतं. यंदा सार्वजनिक गणपती फारच कमी असल्यामुळं अनंत चतुर्दशीच्या दिवशीही विसर्जनाला सार्वजनिक गणपती फारच कमी दिसले. एकूणच कोरोनाचं सावट संपूर्ण गणेशोत्सवावर असल्याचंच दिसून आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading