डोंबिवली रासरंग – २०२३ या महोत्सवाचेआयोजन

डोंबिवली शहरासह सर्वत्र चर्चिल्या जाणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित रासरंग – २०२३ या महोत्सवाचे अधिक भव्यतेने आणि सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. नेत्र दिपवणारा भव्य मंच, नागरिकांना गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा, दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत आणि मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे आबालवृद्ध, सिने अभिनेत्यांची, कलावंताची, मान्यवरांची मांदियाळी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, नवदुर्गांचा सन्मान या विशेष सोहळ्यांसह यंदाचा रासरंग – २०२३ पार पडणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष असून डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार हा महोत्सव नेहमीप्रमाणे संस्मरणीय ठरणार आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली शहरासह संपूर्ण मतदारसंघात विविध सणोत्सवांच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात भव्य स्वरूपात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जागतिक कीर्तीचे अनेक कलावंत या उपक्रमाला उपस्थिती लावत असतात. याच पद्धतीने अधिक भव्यतेने आणि नवरात्रौत्सवाचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या रासरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात रासरंग – २०२३ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading