डोंबिवली- तळोजा मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली मेट्रोचं भूमीपूजन येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमार्गे कल्याण, शीळ, तळोजा मेट्रोची मागणी केली होती. २१ ऑक्टोबर २०१६ ला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी या मेट्रो मार्गाचं सविस्तर सादरीकरण केलं होतं. कल्याण, डोंबिवली, २७ गावं, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराची लोकसंख्या प्रत्येक दशकात कशाप्रकारे वाढत आहे याची आकडेवारी सादर करताना कुठल्या मार्गाने मेट्रो नेल्यास अधिकाधिक लोकसंख्येला तिचा लाभ होईल याचं अभ्यासपूर्ण सादरीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवत विस्तृत प्रकल्प आराखडा सादर करण्याचे आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला दिले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर २१ नोव्हेंबर २०१८ ला मुंबई महानगर प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या आराखड्याला मंजुरी दिली होती. या मेट्रोचा मार्ग एपीएमसी मार्केट, कल्याण, गणेशनगर, पिसवली गाव, गोळीवली, डोंबिवली, एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाळेगाव, वाकळण, तुर्भे, पिसवे डेपो, तळोजा असा आहे. आता या मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading