डोंबिवलीतील सोन्या चांदीच्या दुकानातील चोरीचा पावणेतीन लाखाचा ऐवज हस्तगत

डोंबिवलीतील सोन्या चांदीच्या दुकानातील चोरीचा पावणेतीन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आल आहे. 19 जानेवारीला डोंबिवलीमध्ये 13 लाख 65 हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी झाली होती.याप्रकरणी समांतर तपास करत असताना भिवंडी गुन्हे शाखेलामिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिवासिंग बाबरी याला अटक केली होती. त्याच्याकडून चौकशीमध्ये कल्याण मधील एक मारुती इको कार चोरी केल्याची कबुली त्यानं दिली होती. त्याचे आधी चौकशी करता त्यांना भिवंडी आणि मुंबई परिसरातून साठी वाहना चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून एक मारुती इको कार, बजाज पल्सर, होंडा पॅशन प्रो अशी वाहन हस्तगत करण्यात आली आहेत. शिवा सिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading