डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे गुरूवारी २६ डिसेंबर रोजी गोदूताई परूळेकर उद्यान येथे सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहता येणार आहे. पाटीलवाडीतील गोदूताई परूळेकर मैदानात दुर्बिणीतून खंडग्रास सूर्यग्रहण दाखवून मार्गदर्शन केलं जाणार आहे. यावेळी खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण ग्रहणविषयी विशेष माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि खगोलप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा. ग्रहण पाहण्यासाठी सोलर चष्मे दिले जाणार आहेत. अधिक चौकशीसाठी ९२२३८ १०३८२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.