डिजिटल ग्रंथयान या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी श्रावणावर आधारित घन निळा बरसला

मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे डिजिटल ग्रंथयान या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी ‘श्रावण’ या विषयावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. घन निळा बरसला हा काव्य, गाणी, रंग आणि नृत्य असा विविधरंगी, मोरपंखी कार्यक्रम सादर होणार आहे. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, विजयराज बोधनकर, मेघना साने, रामदास खरे, विनोद पितळे, श्रीरंग भावे, संजीव फडके, मनोज वारदे, भाग्यश्री फडके, सायली खरे, साधना जोशी, स्नेहा राणे, मेधा भावे आदी कलाकार यात आपले रंग भरणार आहेत. शुक्रवारी ३१ जुलैला हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या फेसबुक पेज वर संध्याकाळी ५ वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी संजीव फडके यांच्याशी ९९३०८३६५५७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading