ठामपा जेटींग गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना थकीत बोनस मिळवून देण्यात श्रमिक जनता संघाला यश

ठाणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील जेटींग गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना २०२०-२१चे थकीत बोनसची रक्कम अखेर १५ दिवसांत अदा करण्याचे लेखी आश्वासन श्रमिक जनता संघ युनियनचे शिष्टमंडळाबरोबर लेखी करार करून ओम इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चे मालक विवेक ढमढेरे यांनी दिले आहे. २०१०-२१ या आर्थिक वर्षाचे बोनस ठेकेदारानी कर्मचाऱ्यांना अदा केले नसल्याने युनियन तर्फे कामगार उप आयुक्त कार्यालयात वसुली दावा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांच्या समक्ष सुनावणी सुरू असतांना ठेकेदार ढमढेरे यांनी युनियनचे शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत १५ दिवसांच्या आत बोनसची रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन युनियनचे शिष्टमंडळाला दिल्याने कामगारांना थकीत बोनसची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading