ठामपाच्या परिवहन उपव्यवस्थापक पदावर शशिकांत धात्रक यांची नियुक्ती

ठामपाच्या परिवहन सेवेत गेली अनेक वर्षे उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या दिलीप कानडे यांना अखेर पदावरुन दूर केले असून त्यांच्या जागी शशिकांत धात्रक यांची नियुक्ती कण्यात आली आहे. कानडे यांना न हटविल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी दिला होता. त्यांच्या या इशार्‍यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे? परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करुनही गेल्या दहा वर्षात ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला कानडे हे केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबीत करावे; अन्यथा, परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला होता. शमीम खान यांच्या इशार्‍यानंतर परिवहन व्यवस्थापक ज्ञानेश्वर ढेरे यांनी सोमवारी एका पत्रान्वये दिलीप कानडे यांना पदावरुन दूर केले असून त्यांच्या जागी शशिकांत धात्रक यांची नियुक्ती केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading