ठाण्याला मिळणार वाढीव पाण्याचा फायदा

ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याची ओरड सुरु होती. परंतु येत्या काही महिन्यात ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. याठिकाणी टेमघर जलशुध्दीकरण केंद्रावर पाच नवीन पंप बसविले जाणार असल्याने त्यातून ७० दशलक्ष वाढीव पाणी मिळणार आहे. तसेच स्टेमच्या माध्यमातून १८८ कोटींचा खर्च करुन नव्याने जलवाहीनीचे काम केल्यास त्यातून २० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली. संजय भोईर यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपनगर अभियंता अर्जुन आहीरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार यांच्यासोबत पिसे आणी टेमघर जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी टेमघर येथील पंपीगची इमारत ही २० वर्षे जुनी झाली असून त्याची दुरुस्तीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार त्याची दुरुस्ती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. टेमघर टेमघर जलशुध्दीकरण केंद्र पाहणी, दुरुस्तीची गरज आहे, पंपाची इमारत २० वर्षे जुनी झाली आहे त्यामुळे तीच्या दुरुस्तीची गरज आहे. प्लान्टच्या वरील चॅनेल्स देखील बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. ही दुरुस्ती झाल्यास त्याठिकाणी नव्याने बसविण्यात येणा:या पाच पंपाना देखील त्याचा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी नवीन पाच पंप उपलब्ध झाले आहेत, त्यानुसार एका महिन्याच्या आत या कामाला सुरवात होणार आहे. त्यानंतर सध्या टेमघर मधून ठाणे शहराला आजच्या घडीला २१० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. परंतु हे पंप बसविल्यानंतर पाण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे वाढीव ७०दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराला २८० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्टेमकडून जे पाणी उचलले जात आहे, त्याची जलवाहीनी ही जुनी झाली असल्याने त्यातून पाणी खेचण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पंपातून पाणी खेचले जात नसल्याचेही निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टेमघरपर्यंत ही जलवाहीनी बदलण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असून स्टेमच्या माध्यमातून हे काम केल्यास त्यासाठी १८८ कोटींचा खर्च येणार आहे. परंतु ठाण्याची पाण्याची निकड लक्षात घेऊन हे काम होणे गरजेचे असल्याचे मत भोईर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. शहाड ते पीसे सुमारे १५ किमीची जलवाहीनी बदली केल्यास ठाण्याला वाढीव पाण्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी स्टेमने निविदा प्रक्रिया राबवून वेळेत हे काम केले तर पुढील सात ते आठ महिन्यात हे काम पूर्ण होऊन ठाण्याला वाढीव पाण्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच येत्या काळात ठाण्याची तहान यामुळे निश्चित भागविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading